13 December 2017

News Flash

नक्षलवादी रंजिता अखेर अटकेत

जहाल नक्षलवादी व खोब्रामेंढा दलम कमांडर रंजिता हिला गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाने मंगळवारी

खास प्रतिनिधी , चंद्रपूर | Updated: November 8, 2012 3:59 AM

जहाल नक्षलवादी व खोब्रामेंढा दलम कमांडर रंजिता हिला गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाने मंगळवारी सायंकाळी तरवीदंड या गावात अटक केली. प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने व वाताच्या त्रासाने ग्रस्त असलेली रंजिता येथे उपचारासाठी आलेली होती. तिच्या अटकेने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. गडचिरोली जिल्हय़ातील पिंद या गावची मूळ रहिवासी असलेली रंजिता ही ऐन तारुण्यात १९९१ च्या दशकात नक्षलवादी चळवळीत ओढली गेली. नक्षल चळवळीत सक्रिय होताच तिने हत्या, सुरुंग स्फोट, शासकीय कार्यालयांची हानी, जाळपोळ, वाहनांची जाळपोळ, धमकी, मारहाणीचा सपाटा सुरू केला. अतिदुर्गम गावात घुसून लोकांना तसेच पोलिसांना तिने सळो की पळो करून सोडले होते. तिच्या दहशतीची दखल घेऊन नक्षल चळवळीतील नेत्यांनी तिच्यावरखोब्रामेंढा दलमची प्रमुख अर्थात कमांडर म्हणून जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना तिने अनेक महत्त्वपूर्ण घटना घडवून आणत पोलीस दलाला त्रस्त करून सोडले होते.    

First Published on November 8, 2012 3:59 am

Web Title: naxel leader ranjita arrest