News Flash

तारे तारकांकडे सापडलेल्या १/२ ग्रॅम ड्रग्सची चौकशी झाली असेल, तर एनसीबीनं…- शिवसेना

मिरा-भाईंदर, पिंपरी चिंचवडमधील ड्रग्ज तस्करीकडे वेधलं लक्ष

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज सेवनाचा मुद्दा समोर आल्यानंतर एनसीबीनं तपास सुरू केला होता. याप्रकरणात एनसीबीनं अमली पदार्थ जप्त करत काही जणांना अटक केली होती. यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीला शिवसेनेनं टोला लगावला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृत्यूवरून शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर ईडी व अमली पदार्थविरोधी विभागानंही (एनसीबी) या प्रकरणाचा आर्थिक व ड्रग्ज तस्करीच्या अंगानं तपास सुरू केला होता. याप्रकरणात एनसीबीला ड्रग्ज आढळून आलं होतं. त्याचबरोबर रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकसह काही जणांना अटक केली होती. एनसीबीकडून अजून हा तपास सुरू असून, शिवसेनेनं तपासावरून टीका केली आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून एनसीबीचं इतर ठिकाणी सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी व विक्रीकडे लक्ष वेधलं आहे. “चित्रपटसृष्टीच्या तारे तारकांकडे सापडलेल्या १/२ ग्रॅम ड्रग्सची चौकशी पूर्ण करून झाली असेल, तर एन.सी.बी.नं मीरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड शहरात किलोने ड्रग्स विकणाऱ्यांकडे मोर्चा वळवावा, जेणेकरून तरुणाईला व्यसनाधीन करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍यांना धडा शिकवता येईल,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील काही कलाकार ड्रग्ज सेवन करत असल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात एनसीबीनं चौकशी सुरू केली होती. यात सुशांतचा नोकर दीपेशला अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर रिया चक्रवर्तीच्या भावाला व नंतर रियालाही अटक करण्यात आली होती. रिया सध्या जामीनावर बाहेर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 12:34 pm

Web Title: ncb drugs case sushant singh rajput case pratap sirnaik shivsena leader bmh 90
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 …त्या प्रश्नाच्या भीतीमुळेच गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं; राष्ट्रवादीचा भाजपावर निशाणा
2 “… हे स्टार प्रचारक बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली अब्रू घालवणार”
3 अमर, अकबर, अँथनीच रॉर्बट शेठला पराभूत करतील; काँग्रेसचं रावसाहेब दानवेंना उत्तर
Just Now!
X