31 May 2020

News Flash

सरकारच्या असंवेदनशीलतेवर राष्ट्रवादीच्या आंदोलनात टीका

राष्ट्रवादीने ५ जूनपासूनच शेतकरी कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन झाले. परभणी तहसीलसमोर आंदोलनात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, खरिपासाठी बियाणे व खते मोफत पुरवावीत, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे जिल्हाभर तहसील कार्यालयांसमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी दुष्काळात होरपळत असताना हे सरकार कुठलेच निर्णय घेत नाही, असा आरोप करून सरकारच्या असंवेदनशीलतेविरोधात राष्ट्रवादीने हे आंदोलन करून रोष व्यक्त केला.

राष्ट्रवादीने ५ जूनपासूनच शेतकरी कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धरणे धरली. स्थानिक पातळीवर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कर्जमाफीसोबतच मोफत बी-बियाणे व खत, जनावरांना चारा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफी, मजुरांच्या हाताला काम आदी मागण्या यात केल्या आहेत. परभणीत शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्यासह ज्येष्ठ नेते, कार्यकत्रे आंदोलनात सहभागी झाले. माजी मंत्री गणेश दुधगावकर, राष्ट्रवादीचे परभणी विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत, संतोष बोबडे, सोनाली देशमुख, गंगाधर जवंजाळ, अली खान आदींसह कार्यकत्रे आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांची या वेळी भाषणे झाली. जिंतूर तहसीलसमोर जिल्हाध्यक्ष आमदार भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी धरणे धरली. तालुकाध्यक्ष शरद अंभुरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, बाळासाहेब भांबळे, मनेज थिटे, पुंजारे गुरुजी, शौकत लाला आदी आंदोलनात सहभागी झाले होते. पालम तहसीलसमोर आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात वसंतराव सिरस्कर, प्रभाकरराव सिरस्कर, नरहरी ढगे, नामदेव कदम, माजी खासदार सुरेश जाधव, किसनराव भोसले, एच. के. पठाण आदी सहभागी झाले होते. पाथरी तहसीलसमोर आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात तालुकाध्यक्ष विठ्ठल रासवे, अ‍ॅड. मुंजाजी भाले पाटील, जि.प. सभापती दादासाहेब टेंगसे, बाजार समिती सभापती अनिल नखाते, चक्रधर उगले आदी सहभागी झाले. पूर्णा येथे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात माजी सभापती दिगंबर कऱ्हाळे, रितेश काळे, अ‍ॅड. गोिवद िशदे, शिवाजी सौराते, साहेब कल्याणकर आदींचा सहभाग होता. सोनपेठ तहसीलसमोर जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी, पंचायत समिती सभापती छाया िशगाडे, उपसभापती मदनराव भोसले, बाजार समितीचे संचालक अशोक यादव, दत्तराव िशगाडे आदी सहभागी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 2:35 am

Web Title: ncp agitation against government insensitive
Next Stories
1 ‘दुष्काळ हाताळण्यामध्ये सरकार-प्रशासन अपयशी’
2 प्रदेश भाजपकडून लातूरकरांची थट्टा
3 ‘कर्जाच्या किमतीएवढाच बोजा शेतजमिनीवर हवा!’
Just Now!
X