मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण येथे पुराने थैमान घातला. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत पोहोचले होते. दरम्यान यावेळी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांचा पारा चढला आणि त्यांनी सर्वांसमोर आधी फोनवर आणि नंतर समोरासमोर अधिकाऱ्यांना झापलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर नाव न घेता टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. पण आपल्यासोबत अधिकारी असले पाहिजेत अशी अपेक्षा करु नये,” असंही ते म्हणाले आहेत.

“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंनी फटकारलेल्या ‘त्या’ घटनेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावण्यासंबंधी तसंच फडणवीसांनी अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या असा आरोप करण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “मी आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यास मोकळा नाही. जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असलं तरी असंच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद मधे आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतिधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली नाही”.

“तळी उचलण्याची सवयच असलेल्यांना…”, नारायण राणे शिवसेनेवर संतापले; मुख्यमंत्र्यांनाही लगावला टोला

“अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता,” असंही यावेळी ते म्हणाले.

नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

पूर्ण पाणी कमी झाल्याशिवाय शेतांची अवस्था कळू शकत नाही. पाणी ओसरलं आहे तिथे पंचनामे सुरु आहेत. त्यानुसार मदत केली जाईल असं सांगताना अजित पवारांनी विरोधकांसह सर्वांनी जिल्हाधिकारी, प्रांत, मामलेदारांना आपली काम करु द्यावी असं आवाहन केलं. “वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासोबत आम्ही नोडल अधिकारी नेमले असून ते माहिती देतील. व्हीआयपी गेले तर त्यांच्या मागे सगळे फिरत राहतात आणि कामावर परिणाम होतो,” असं अजित पवारांनी सांगितलं.

“मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे करणं आपली संस्कृती नाही”

“काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना अरे तुरे शब्द वापरले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अनेक मोछे व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री झाले. यांच्या काळात कधीही कोणीही, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अनुद्दार काढले नव्हते,” असं सांगत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.

“टास्क फोर्सची बैठक होईल आणि जिल्ह्यांची संख्या हाती येईल त्यानंतर निर्बँध शिथिल करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असून त्यांनी तज्ज्ञांशी बोलून जिथे करोना कमी झाला आहे तिथे योग्य विचार करुन निर्णय घेतला जाणार आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.