कोकण दौऱ्यात नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे करणं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगताना अजित पवारांनी योग्य भाषा वापरली पाहिजे असं मत मांडलं. यावर नारायण राणेंचं सुपूत्र आणि आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. कोणती भाषा वापरावी हे अजित पवार यांनी सांगणे म्हणजे राज कुंद्राने कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखे आहे असा टोला त्यांनी लगावला होता. दरम्यान नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापणाऱ्या नारायण राणेंवर अजित पवारांची नाव न घेता टीका; म्हणाले…

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी तुमच्यावर टीका केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “कोणीही टीका करतं त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असतं. दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही”.

मुख्यमंत्र्यांबद्दलची राणेंची भाषा असंस्कृत – अजित पवार

नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे-तुरे’ असे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केंद्रीय लघु उद्योगमंत्री आणि भाजपनेते नारायण राणे यांना सुनावले. तुम्ही आपत्तीग्रस्तांना भेटायला गेला होता की अधिकाऱ्यांना असा सवालही अजित पवार यांनी केला.

“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंनी फटकारलेल्या ‘त्या’ घटनेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…

कोकणात पूरपरिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. वृत्तवाहिन्यांवरून ते संभाषण लोकांपर्यंत पोहोचले. त्याबाबत अजित पवार यांनी भाष्य के ले. मुख्यमंत्री एखादी पाहणी करण्यासाठी जातात त्यावेळी राजशिष्टाचाराप्रमाणे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतात. नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात असेही पवार यांनी सुनावले तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलात असा संतप्त सवालही पवार यांनी केला.

कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली तेव्हापासून मोठमोठे लोक राज्याचे प्रमुख झाले. त्यामध्ये वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचा काळ आठवला तर कधीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार त्या काळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनी काढले नव्हते, असेही पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar on bjp nitesh rane raj kundra maharashtra rain konkan svk 88 sgy
First published on: 30-07-2021 at 10:38 IST