News Flash

शेतकर्‍यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा – अजित पवार

३१ मार्चअखेर राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांचा समावेश

संग्रहित छायाचित्र

राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात  ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.

याआधी अजित पवार यांनी ११ हजार ४६८ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. १५ मार्च रोजी अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, “महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे”.

अजित पवार यांनी आणखी एक टि्वट करून कोणत्या बँकांमध्ये किती रक्कम जमा केली, हेही स्पष्ट केलं होतं. “जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१९२.५० कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 11:12 am

Web Title: ncp ajit pawar on maharashtra famer loan waiver sgy 87
Next Stories
1 लॉकडाउन : ५०० रुपये दंड आणि गाढवावरून धिंड; गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल
2 Coronavirus : उद्धव ठाकरेंनी अभिनेत्याला दिला शब्द; म्हणाले, ‘काळजी करू नका, त्वरित मदत केली जाईल
3 Coronavirus : कसा होतो करोनाचा गुणाकार?; डॉ. अमोल कोल्हे म्हणतात…
Just Now!
X