28 September 2020

News Flash

कर्जमाफी दूरच उलट शेतकऱ्यांची १२ ते १३ टक्के व्याज आकारून लुटमार सुरु -अजित पवार

'विरोधी पक्षनेत्यांना फोडण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीत हे योग्य आहे का?'

(विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेससह सर्व विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त बैठक पार पडली)

सोमवारपासून(दि.17) सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद पार पडली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी, पीक कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना जाहीर झालेली कर्जमाफी मिळणे तर दूरच उलट शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के दराने व्याज आकारून त्यांची लुटमार चालू आहे. वास्तविक आघाडी सरकारने शेतकर्‍यांना ० ते २ टक्के दराने पीक कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य झाले नाही त्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक होते. परंतु सध्याचे फडणवीस सरकार शेतकर्‍यांच्या पुनर्गठीत कर्जावर १२ ते १३ टक्के दराने जाचक व्याज आकारणी करत आहे. यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या तर त्याचं पापही याच सरकारचं असेल अशी टीका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिवेशन सुरु होत असताना वरच्या सभागृहात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे जनतेचे विषय मांडतीलच शिवाय आम्ही खालच्या सभागृहात आवाज उठवणार आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी करणार आहोत अशी माहिती अजित पवार यांनी दिली.  ऑक्टोबरमध्ये १९१ तालुके दुष्काळात होरपळत होते परंतु छावण्या एप्रिलमध्ये सुरु केल्या म्हणजे याचे सरकारने योग्य नियोजन केलेले नाही, विरोधी पक्षनेत्यांना फोडण्याचे काम केले जात आहे. कुठल्या रस्त्याने हे लोक घेवून जात आहे. लोकशाहीत हे योग्य आहे का? या सरकारने तारतम्य ठेवले नाही असा आरोप अजित पवार यांनी केला.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष टिकला पाहिजे परंतु यालाच गालबोट लावण्याचे काम या सरकारकडून केले गेले, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली. यावेळी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि येत्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर सरकारला सळो की पळो करून सोडण्याचे स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 3:23 pm

Web Title: ncp ajit pawar slams bjp government before the start of monsoon session sas 89
Next Stories
1 फडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार : धनंजय मुंडे
2 मंत्रीमंडळातून यांना मिळाला डच्चू
3 नुसत्या नोकर्‍यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील प्रतिभा ओळखा : राज ठाकरे
Just Now!
X