कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी जाहीर करण्यात आली. भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांची उमेदवारी घोषित केली असून शिवसेनेनेदेखील उमेदवार जाहीर करत आज मात्र उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कणकवली नगरपंचायत निवडणूकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी केली. स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रवीण भोसले व जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांच्यात चर्चा होऊन आघाडी करण्याचा निर्णय स्वाभिमानने जाहीर केला. भाजपाने नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी दिल्याने भाजपा व स्वाभिमानची राजकीय समीकरणे जुळतील असे वाटत होते, पण भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संदेश पारकर यांचे नाव घोषित केले. त्यानंतर राणे यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा निर्णय आज घेतला. नारायण राणे यांच्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीची समीकरणे बदलतील असे वाटत होते. स्वाभिमानची जबाबदारी आम. नितेश राणे यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. कणकवली तहसीलदार कार्यालयात शिवसेनेतून प्रभाग १३ असून सुशांत नाईक, प्रभाग १५ मधून मानसी मुंज, प्रभाग २ मधून साक्षी आमडोसकर, प्रभाग १७ मधून विलास जाधव व प्रभाग १० मधून परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रांताधिकारी श्रीमती नीता सावंत-शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

शिवसेनेने प्रभागनिहाय उमेदवारी घोषित केली आहे. प्रभाग १ मधून सुवर्णा शेखर राणे, प्रभाग २ साक्षी आमडोसकर, प्रभाग ३ मारुती राणे, प्रभाग ४ भिवा परब, संकेत नाईक, प्रभाग ५ अश्विनी मोर्ये, प्रभाग ६ नंदिनी धुमाळे, प्रभाग ८ साक्षी कांबळी, प्रभाग ९ वैभव पारकर, प्रभाग १० माही परुळेकर, प्रभाग ११ सुजीत जाधव, प्रभाग १३ सुशांत नाईक, प्रभाग १४ संजय पारकर, प्रभाग १५ मानसी मुंज, प्रभाग १६ बाळू पाटकर, राजू वर्णे, प्रभाग १७ बाबू जाधव यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Yashwant Sena, Sanjay Kshirsagar
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात
pawar group fixed 10 candidates for lok sabha election 2024 zws
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जागावाटप जाहीर; अहमदनगरमधून निलेश लंकेच्या नावाची घोषणा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत स्वाभिमानची भाजपाशी युती नाही असे स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी घोषित केले आहे. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्यात कणकवली नगरपंचायत निवडणूक स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादीने आघाडी करण्याची चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी म्हटले आहे. स्वाभिमान व राष्ट्रवादी आघाडी उमेदवारांची यादी गुढीपाडव्यादिवशी जाहीर होणार आहे.