25 November 2020

News Flash

फुंकर तीच असते…अमोल कोल्हेंचं ‘त्या’ मीम्सला सडेतोड उत्तर

पंक्चर झालेल्या ट्रकच्या टायरला एक लहान मुलगा तोंडाने हवा भरतानाचेही मीम्स होते.

ऑगस्ट महिन्यात खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवस्वराज्य यात्रा काढली होती. त्यावेळी अमोल कोल्हेंवरील मीम्स व्हायरल झाले होते. यामध्ये पंक्चर झालेल्या ट्रकच्या टायरला एक लहान मुलगा तोंडाने हवा भरतानाचेही मीम्स होते.

या व्हायरल मीम्समध्ये पंक्चर टायरला राष्ट्रवादीचे नाव तर हवा भरणाऱ्या मुलाला अमोल कोल्हे यांचे नाव दिले. या व्हायरल मीम्सला अमोल कोल्हेनी शनिवारी सडेतोड उत्तर दिलं आहे. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर ही पोस्ट पुन्हा एकदा शेअर करत सणसणीत उत्तर दिलं आहे. या फोटोला त्यांनी भन्नट कॅप्शनही दिलं.


अमोल कोल्हेंनी नेमकं काय म्हटलेय ?

सहज फोन चाळताना ऑगस्ट महिन्यातली एक पोस्ट समोर आली आणि सहज सुचलं.
फुंकर तीच असते..
जी मेणबत्ती विझवू शकते अन
निखारा चेतवू शकते..
टीकेच्या वाऱ्याने भेलकांडायचं की
तेच वारं शिडात भरून घ्यायचं..
आपलं आपण ठरवायचं!

कदाचित त्यावेळी पोस्ट तयार करणारा “गोवर्धन” उचलण्याची गोष्ट विसरला असावा. महाराष्ट्रात “शरदचंद्रजी पवार” नावाचा झंझावात आला अन (पोस्ट टाकणाऱ्या व त्यावर हसणाऱ्यांना) पंक्चर वाटणारी गाडी 105 च्या स्पीडने सुसाट निघाली.”

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनं राज्यातील तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली. या यात्रेच नेतृत्व पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांकडे देण्यापेक्षा त्याचं नेतृत्व राज्यात लोकप्रिय असलेले खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आले. या यात्रेला राज्यातील ग्रामीण भागात तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमोल कोल्हेंनी तरुण कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 11:40 am

Web Title: ncp amol kolhe viral post facebook nck 90
Next Stories
1 दिवाळी भेट ! बहुप्रतिक्षित विमानसेवेला अखेर सुरूवात, नाशिक-पुणेकरांना दिलासा
2 मुस्लिम शेजारी दिवाळी साजरी करु देत नाही, अभिनेत्याची मोदींकडे तक्रार
3 ‘त्या ‘क्लीपमधील वाक्याने घायळ झाले ती उठलेच नाही, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट व्हायरल
Just Now!
X