23 September 2020

News Flash

काँग्रेस, राष्ट्रवादीचे लवकरच विलीनीकरण

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आज भिन्न असले तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष लवकरच एकमेकात मिसळतील, त्यांचे विलीनीकरण

| February 18, 2014 08:54 am

सुशीलकुमार शिंदे यांचे भाकीत
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आज भिन्न असले तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष लवकरच एकमेकात मिसळतील, त्यांचे विलीनीकरण होईल, असे भाकीत काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केले. शरद पवार आणि आपण अनेक सुख-दु:खात एकत्र असतो, असेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर शिंदे यांनी संपूर्ण सोलापूर मतदारसंघातील संपर्क वाढवून प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कृतज्ञता मेळावे, स्नेहमेळावे, सभा-संमेलनांचा शिंदे यांनी सपाटा लावला आहे. या सर्व कार्यक्रमांपैकी एकाही ठिकाणी शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा वाहण्याचे व्रत सोडले नाही. शरद पवार यांच्यासोबतचा मैत्रीचा धागा अधिक मजबूत करीत, शिंदे यांनी आता काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये ऐक्य घडण्याचे संकेत दिल़े त्याचवेळी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी हेच असल्याचा  निर्वाळाही त्यांनी दिला.
शिंदे यांनी यापूर्वी अनेकवेळा शरदनिष्ठा जाहीर केली होती. आपले राजकीय गुरू शरद पवार हेच असून आज आपण जे काही आहोत, ते केवळ शरद पवारांमुळे, आपल्यात जे काही चांगले ते शरद पवारांचे आणि जे वाईट आहे, ते आपले स्वत:चे असल्याची भावना त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त केली आहे. मागील २०१२ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीच्यावेळी पवार यांच्याबरोबर आपले काहीसे बिघडले होते. त्यामागे कोणी तरी त्यांचा गैरसमज करून दिला होता, हेदेखील सांगायला शिंदे विसरत नाहीत. लोकसभा निवडणुकीत सोलापुरात शिंदे हेच काँग्रेसचे उमेदवार असल्याचे उघड गुपित असून त्या अनषंगाने त्यांचे संपर्क दौरे वाढले आहेत. त्यामुळे सोलापुरात काँग्रेसजनांएवढेच राष्ट्रवादी वासियांमध्ये उत्साहाचे भरते होत़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:54 am

Web Title: ncp and congress both parties will become one sushilkumar shinde
टॅग Sushilkumar Shinde
Next Stories
1 अमरावतीजवळील बेलोरा विमानतळाची उभारणी विमानपत्तन प्राधिकरणाकडे
2 अंजली दमानिया यांची अखेर खा. संचेतींविरुद्ध पोलिसांत तक्रार
3 जागावाटपावरून ‘आप’मध्येही धूसफूस
Just Now!
X