टायगर अभी जिंदा है च्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने परळीत कडकडीत बंद पाळला. शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याप्रकरणी हा बंद पाळण्यात आला. या बंदला परळीत चांगला प्रतिसाद मिळाला. ‘टायगर अभी जिंदा है’, ‘पवारसाहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’, ‘या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय’ या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परळी दणाणून सोडलं.

ईडीने केलेली कारवाई ही मोदी आणि फडणवीस सरकारच्या इशाऱ्यावरुन सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे अशी टीकाही राष्ट्रवादीच्या काही आंदोलनकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा पार पडला.

शिखर बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी कोणताही संबंध नसताना केवळ राजकीय सूडबुद्धीने आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे घाबरलेल्या सरकारने शरद पवार यांच्यावर ईडीमार्फत गुन्हा दाखल अडकवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे परळीतच नाही तर राज्यभरात पडसाद उमटले आहेत.

या आंदोलनात शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, ज्येष्ठ नेते सुरेश टाक, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, केशव बळवंत, संजय फड, बाळूशेठ लड्डा, गोपाळ आंधळे, श्रीकांत मांडे, सुरेश गित्ते, कमलकिशोर सारडा, प्रताप देशमुख, शंकर आडेपवार, अनिल अष्टेकर, अजिज कच्छी सिराज भाई, शंकर कापसे, सचिन जोशी, दिलीप कराड, विष्णु साखरे, के.डी.उपाडे, अनंत इंगळे, बळीराम नागरगोजे, जमील अध्यक्ष, सचिन देवकर, सचिन मराठे, महेश शेप, महेंद्र रोडे दत्ता सावंत, नरेश हालगे, नाजेर भाई, वाजेद भाई, एस.यु.फड, सतिश गंजेवार, तौफीक गंजेवार, कृष्णा मिरगे, लालू पठाण, रवि आघाव, शकील कच्छी, रौफीक पटेल, भागवत गित्ते, महिपाल सावंत, पापा ठाकूर, कवडेकर सर, मुसा भाई, चौहान सर, प्रदिप आरसुळे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.