News Flash

‘महिलांचा अपमान करणाऱ्या सरकारला शिवाजी महाराजांचे आशिर्वाद कसे लाभणार?’

भाजपा नेत्यांकडून दारूच्या ब्रँडना महिलांची नावे देण्याची तसेच महिलांच्या अपहरणाची भाषा

शिवाजी महाराजांचे आशिर्वाद कसे लाभणार?

राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांच्या सुरक्षेवरून पुन्हा एकदा राज्यातील फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. आपल्या ‘जवाब दो’ या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राम कदम यांचे नाव न घेता त्यांच्या बेताल वक्तव्यावरून असे मंत्री असणाऱ्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद यांना कसे लाभणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

‘५६ इंच छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ या टॅगलाइन सहित सुरु केलेल्या ‘जबाव दो’ मोहिमेमध्ये आज राष्ट्रवादीने ४१ वा प्रश्न सरकारला विचारला आहे. ‘दारूच्या ब्रँडना महिलांची नावे देण्याची तसेच महिलांच्या अपहरणाची भाषा सत्ताधारी भाजपचे नेते उघडपणे करतात. स्त्रियांच्या सुरक्षितता व सन्मानाला सर्वोच्च महत्त्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद यांना कसे लाभणार?’ असे ट्विट राष्ट्रवादीच्या ट्विटवर अकाऊण्टवरून करण्यात आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये नंदुरबार येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगाम कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दारूच्या ब्रॅण्डला महिलांचे नाव द्यावे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यातील दारूच्या खपासाठी दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्यावीत, असे महाजन म्हणाले होते. तर दहहिंडीच्या कार्यक्रमामध्ये घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी मुली पळवून आणण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. घाटकोपर येथे राम कदम यांनी दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित गोविंदांसमोर बोलताना त्यांनी ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’ असे वक्तव्य केले होते.

महिलांबद्दल अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना स्त्रियांची सुरक्षितता आणि सन्मानाला सर्वोच्च महत्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद कसे मिळणार असा प्रश राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. आता राष्ट्रवादीच्या या ट्विटला भाजपाकडून काय उत्तर येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 9:40 am

Web Title: ncp attack bjp government over womens safety issue
Next Stories
1 धक्कादायक..! तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना
2 राज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता
3 ‘मराठा क्रांती मोर्चातील पोलिसांवरील हल्ले वगळता
Just Now!
X