27 January 2021

News Flash

पवारांचं कौतुक केल्याने पंकजा मुंडेही भाजपातून बाहेर पडण्याची चर्चा, चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाविकास आघाडीवर केली टीका

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवार यांचं जाहीर कौतुक केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. एकनाथ खडसेंनंतर पंकजा मुंडेही पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे दावे होऊ लागले. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता.

“पवार साहेब हॅट्स ऑफ”; पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सलाम

“आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा,” रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक

चंद्रकांत पाटलांना यावरुन त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “”ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मीदेखील अनेक वेळा शरद पवार या वयात किती प्रवास करतात, शेती आणि सहकार विषयातलं ज्ञान यासंबंधी सांगत असतो. आम्ही मंत्री असताना सामान्यांसाठी फोन करुन ते चर्चा करायचे. आता चांगल्याला चांगलं म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आम्ही ची उचलली आहे. पण महाविकास आघाडीने उचलली नाही. फडणवीसांनी केलेलं सगळं रद्द केलं”.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं होतं –
“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत झालेल्या बैठकीत तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेसुद्धा उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 4:41 pm

Web Title: ncp chandrakant patil on pankaja munde tweet praising sharad pawar svk 88 sgy 87
Next Stories
1 “…तुमच्यात हिंमत नाही,” चंद्रकांत पाटलांचं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाहीर आव्हान
2 कडव्या विचारांपासून दोनदा परावृत्त करुनही पुण्यातील तरुणी पुन्हा ISISमध्ये दाखल!
3 संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांचं जाहीर कौतुक, म्हणाले…
Just Now!
X