News Flash

“जो प्रश्न आपल्याला समजतही नाही तो प्रश्न सोडवून शरद पवार मोकळे झालेले असतात”

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातील समर्थकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने राज्यभरातील समर्थकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही शरद पवार यांच्याबद्दलच्या आठवणी जागवत शुभेच्छा दिल्या असून आभार व्यक्त केले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं मोलाचं योगदान असून त्याबद्दलही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भरभरुन सांगितलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

आणखी वाचा- राज्याला धक्का देणाऱ्या ‘पुलोद’ प्रयोगानं महाराष्ट्राला सर्वात तरुण मुख्यमंत्री दिला

यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला जर कोणता उत्कृष्ट मुख्यमंत्री लाभला असेल तर ते म्हणजे खासदार शरद पवार साहेब! आज ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जी वास्तू उभी आहे त्याची पायाभरणी साहेबांनी केली आहे. सर्वच क्षेत्रात साहेबांनी आपला ठसा उमटवला आहे”.

आणखी वाचा- शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेलं आंतरराष्ट्रीय मासिक मार्केटमध्ये दिसलंच नाही, कारण…

‘जो प्रश्न आपल्याला समजतही नाही त्या प्रश्नाची सोडवणूक करून शरद पवार मोकळे झालेले असतात. लातूर भूकंप, भूज भूकंप या आपत्तींमध्ये साहेबांनी संवेदनशील परिस्थिती योग्यरित्या हातळली. मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी काही तासात मुंबईत पूर्ववत केली,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

“शरद पवार साहेबांची प्रतिभा आणि कार्य प्रचंड मोठे आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच साहेबांचा गौरव केला. वाजपेयी साहेब म्हणायचे की पवार साहब इतने आगे है क्यूंकी उनके साथ प्रतिभा है!,” अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली. “पवार साहेब नेहमीच आपल्या सहकार्यांच्या पाठिशी उभे राहतात. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी सर्वतोपरी मदत केली. तेव्हा ते म्हणाले होते की, भुजबळ आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाही. सर्व काही संपलं असं वाटत होतं तेव्हा साहेबांनी पुनर्जन्म दिला,” असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:01 pm

Web Title: ncp chhagan bhujabl sharad pawar birthday yashwantrao chavan center sgy 87
Next Stories
1 “गोपीनाथ मुंडे यांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही”, एकनाथ खडसेंचा भाजपाला घरचा आहेर
2 राज्याला धक्का देणाऱ्या ‘पुलोद’ प्रयोगानं महाराष्ट्राला दिला सर्वात तरुण मुख्यमंत्री
3 Video : पवारांची ‘पॉवर’ कशामुळे? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
Just Now!
X