News Flash

चंद्रकांत पाटलांच्या धमकीला छगन भुजबळांनी दिलं उत्तर; म्हणाले…

फार महागात पडेल अशी धमकीच चंद्रकांत पाटलांनी दिली आहे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींना झाशीच्या राणीची उपमा दिली होती. यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटील यांनी जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल अशी धमकीच भुजबळांना दिली.

दरम्यान एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे”.

“जामीनावर सुटला आहात,” ममता बॅनर्जींचं कौतुक केल्याने चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा

“भुजबळांचा पुतण्या माझ्याकडे सोडवण्याची विनवणी करत होता असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझा पुतण्या म्हणजे समीर भुजबळला माझ्या दोन महिने आधी जेलमध्ये टाकलं होते. मग तो कधी जाईल यांच्याकडे? मुलाचं बोलाल तर तो लांबच होता. त्यामुळे कोण पुतण्या आणि कशासाठी काढला हे माहिती नाही,” असं भुजबळांनी म्हटलं आहे.

“माझ्या केसेस कोर्टात असताना ते महागात पडेल असं म्हणत असतील तर त्याचा काय अर्थ समजायचा. ईडी, सीबीआय यांना जसं हातातील शस्त्र म्हणून वापरत आहेत तसं आता न्यायपालिकाही हातात आहे असं सुचवायचं आहे का?,” अशी विचारणा भुजबळांनी केली.

“मला अटक झाली तेव्हा दोन महिने आधी त्यांनी अटक होणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर अनिल देशमुखांचं सांगितलं आणि आता अनिल परब यांचं नाव घेत आहेत. म्हणून हे घडवून आणत आहेत अशी शंका आहे. लोकांवर फिर्यादी करणं, केसेस टाकणं आणि त्यासाठी यंत्रणा वापरण संध्या चालू आहे. ही यंत्रणा वापरत असताना न्यायपलिका सुद्ध वापरु लागले का?,” अशी शंका भुजबळांनी उपस्थित केली आहे. हा विषय जास्त वाढवण्यात अर्थ नाही आणि मी जास्त किंमतदेखील देत नाही असं सांगत थोडी सहनशीलता वाढवली पाहिजे असा सल्ला त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:13 pm

Web Title: ncp chhagan bhujal on bjp chandrakant patil threat over west bengal election result sgy 87
Next Stories
1 …तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला आव्हान
2 राज्यात शनिवारच्या तुलनेत रविवारच्या रुग्णसंख्येत घट
3 “अदर पूनावाला यांना सुरक्षा कशासाठी?,” नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल
Just Now!
X