27 January 2021

News Flash

“जास्त चर्चा करु शकत नाही,” मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भुजबळ नाराज?

"यावर दोन्ही बाजू होत्या हे नक्की आहे..."

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने त्यावर जास्त चर्चा करता येणार नाही असं ते म्हणाले आहेत. परीक्षा वेळेत झाली पाहिजे असंही काही जणांचं मत होतं हे त्यांनी नमूद केलं. परीक्षा रद्द करू नये, हे माझं वैयक्तिक मत आहे असंही ते म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

“मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बैठकीत मान्य केलं आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त चर्चा करता येणार नाही. पण यावर दोन्ही बाजू होत्या हे नक्की आहे. काही लोकांचं परीक्षा झाल्या पाहिजेत तर काहींचं परीक्षा होता कामा नये असं म्हणणं होतं. मी माझं मत सांगितलं होतं, मुलं तयारी करत असतात. तसंच मराठा कुणबी, कुणबी मराठा या माध्यमातूनही ओबीसी समाजाची मुलं येत असतात. पण काल मुख्यमंत्र्यांनी कोविडची समस्या, परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी याचा विचार केला आहे आणि परीक्षा पुढे ढकलल्या आहेत,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

आणखी वाचा- ‘एमपीएससी’ परीक्षांबाबत अगोदरच निर्णय घ्यायला हवा होता; हे सरकार दिशाहीन आहे – चंद्रकांत पाटील

“आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या परीक्षा पुढे ढकलू तेवढं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का आडवत आहोत. भरतीच्या आड कोणी यावं असं मला वाटत नाही,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- “वडेट्टीवार म्हणाले तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाही?”; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट

“राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसीवर करतात का अजून कोणावर करतात ते बघावं लागेल,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 3:07 pm

Web Title: ncp chhagan bhujbal on postpone mpsc exam maratha reservation sgy 87
Next Stories
1 मराठमोळे श्रीकांत दातार ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’चे डीन नियुक्त झाल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले…
2 ‘..तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही’ रोहित पवारांचं पडळकरांना उत्तर
3 “वडेट्टीवार म्हणाले तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाही?”; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट
Just Now!
X