News Flash

शरद पवार यांच्यावर बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

चाचण्यांमधून पित्ताशयाचं निदान

फाइल फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचं निदान झालं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.

रविवार सायंकाळी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या चाचण्या केल्या. यात त्यांना पित्ताशयाचं विकाराचं निदान झालं आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

मलिकांनी ट्विट करून दिली माहिती…

“आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं आहे. शरद पवारांना हा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना देण्यात येणारी रक्त पातळ करण्याची औषधं थांबवण्यात आली आहेत. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे शरद पवार मागील काही दिवसांपासून माध्यमांशी संवाद साधत होते. या प्रकरणावर त्यांनी वेळोवेळी भाष्य केलं होतं. त्याचबरोबर पुढील काही काळात ते पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रचार दौरेही करणार होते. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 11:11 am

Web Title: ncp chief sharad pawar admitted in breach candy hospital bmh 90
Next Stories
1 मोखाडा : घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
2 कुणीही आघाडीत मिठाचा खडा टाकू नये; राऊतांच्या ‘रोखठोक’वरून अजित पवारांनी साधला निशाणा
3 करोना संकटात अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
Just Now!
X