27 November 2020

News Flash

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक

विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. या दोघांमध्ये मराठा आरक्षण, अधिकाऱ्यांच्या बदल्या या काही विषयांवर चर्चा झाल्याचं समजतं आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा झाली असं समजतं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या दोघांमध्ये ४५ मिनिटं चर्चा पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत मुंबईत उद्या होणाऱ्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, जीएसटीचा केंद्राकडून येणारा परतावा आणि मुख्य म्हणजे राज्यातील आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांवर चर्चा झाल्याचं समजतं आहे.

दरम्यान ही बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधले काही मंत्री वर्षा बंगल्यावर उपस्थित झाले आहेत. तर काही वेळापूर्वीच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. शरद पवार यांचा सल्ला आपण घेत असतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीही सांगितलं आहे. दरम्यान करोनाच्या संकटातून महाराष्ट्राला कसं बाहेर काढायचं यावरही याआधी या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. आता सध्या मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये या विषयावर आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याचं समजतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 7:52 pm

Web Title: ncp chief sharad pawar and cm uddhav thackeray meeting at varsha bunglow scj 81
Next Stories
1 …ही तर देवेंद्र फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी! – बाळासाहेब थोरात
2 राज्यमंत्री बच्चू कडू करोना पॉझिटिव्ह
3 “तारासिंह यांच्या निधनाने जनतेची कामे करणारा जनप्रतिनिधी गमावला”
Just Now!
X