सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवडयांसाठी पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडली. सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून सरकारवर जोरदार टीका सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात आहेत. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले.

आणखी वाचा- उसतोड कामगारांना मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ

“मी उद्या नाशिकला जाणार असून कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे तसेच केंद्र सरकारची भूमिका ही शेतकर्‍यांच्या हिताची आहे असं वाटत नाही” असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात म्हटलं आहे. कांदा प्रश्नावर शरद पवार यांनी भूमिका मांडली.

आणखी वाचा- दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळण्यासाठी परिवहनमंत्र्यांशी तातडीनं चर्चा; शरद पवारांचं आश्वासन

पुण्यात उस तोड मजुराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.