21 September 2018

News Flash

कार अपघातातील जखमींच्या मदतीला धावले शरद पवार

अपघात पाहून पवारांनी गाडी थांबवली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गडचिरोलीत अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात एका गाडीला अपघात झाला होता. हा अपघात पाहून पवारांनी त्यांची गाडी थांबवली आणि ते स्वत: अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

HOT DEALS
  • ARYA Z4 SSP5, 8 GB (Gold)
    ₹ 3799 MRP ₹ 5699 -33%
    ₹380 Cashback
  • Apple iPhone SE 32 GB Space Grey
    ₹ 20493 MRP ₹ 26000 -21%

शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला जात असताना भिलापूरजवळ एका गाडीला अपघात झाला होता. हा अपघात पाहून शरद पवारांनी गाडी धावली आणि जखमींना मदत केली. अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्याने जखमींना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. यावेळी पवारांनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. गाडीत अडकलेल्या तरुण, वृद्धांना बाहेर पडण्यासाठी मदत केल्यावर पवार दौऱ्यासाठी रवाना झाले. यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

First Published on November 15, 2017 12:37 pm

Web Title: ncp chief sharad pawar stops his car to help car accident victims in gadchiroli