06 August 2020

News Flash

लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?, शरद पवार म्हणतात…

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली.

शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही,  याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. ‘माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली. माझी तूर्तास लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मात्र,  यासंदर्भात विचार करु, असे मी त्यांना सांगितल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान एका वाहिनीवर शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी ब्रेकिंग सुरू झाली. त्यावरून सोशल मीडियावर राजकीय चर्चेला उधाण आले. या बाबतची माहिती बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समजताच त्यांनी बैठकीमधून बाहेर येत ‘शरद पवार हे निवडणूक लढवणार नाही’, असा खुलासा केला. यामुळे शरद पवार निवडणूक लढवणार नाही या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

मात्र, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करु, असे सांगितल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2019 3:50 pm

Web Title: ncp chief sharad pawar wont contest lok sabha election 2019
Next Stories
1 राम मंदिराचा विषय हिंदुत्ववाद्यांनीच गुंडाळून ठेवला, शिवसेनेचा आरएसएस, मोदी सरकारवर आरोप
2 देशात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता – छगन भुजबळ
3 ३९ वर्षांत अण्णा हजारे यांचे २०वे उपोषण!
Just Now!
X