08 July 2020

News Flash

सहकारमंत्री सुभाष देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- राष्ट्रवादी

'लोकमंगल' समूहाचे नाव लिहिलेल्या एका जीपमधून ९१ लाखांची रक्कम जप्त केली होती.

सहकारमंत्री सुभाष देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. देशात एकीकडे काळा पैसा हटवण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा मंत्री काळा पैसा बाळगतो. त्यामुळे अशा मंत्र्याची हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते खासदार नवाब मलिक यांनी केली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ समूहाचे नाव लिहिलेल्या एका जीपमधून ९१ लाख ५० हजार रूपयांची रक्कम नगरपालिका निवडणुकीत चलन व्यवहारावर लक्ष ठेवणाऱ्या पथकाने बुधवारी जप्त केली होती. परंतु जप्त केलेली रक्कम ही ऊसाच्या टोळीला अदा करण्यासाठी होती, असे स्पष्टीकरण सुभाष देशमुख यांनी दिले होते. ऊसाच्या टोळीला जुन्या एक हजारांच्या नोटा कशा दिल्या जात होत्या असा सवालही उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने हा काळा पैसा असल्याचा दावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.

बुधवारी उमरगा (जि. उस्मानाबाद) येथील राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर चौरस्ता येथे पोलीस व निवडणूक विभागाच्या पथकाने टाटा सुमो जीप (एमएच १३ बीएन ८६५६) जीप पकडली होती. यामध्ये ९१ लाख ५० हजार रूपयांची रोकड होती. सोलापूरमार्गे उमरगा शहराकडे भरधाव वेगात येणाऱ्या टाटा सुमोचा या पथकाला संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, पकडलेल्या सर्व नोटा एक हजार रूपयांच्या आढळून आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2016 5:35 pm

Web Title: ncp demand to deportation of minister subhash deshmukh
Next Stories
1 सांगलीजवळ १९ लाखांची रोकड जप्त
2 छगन भुजबळ यांची जामीनासाठी हायकोर्टात याचिका
3 नोटबंदीचा निर्णय जालियनवाला बागपेक्षाही भयंकर – शिवसेना
Just Now!
X