News Flash

सूर्यावर थुंकू नका, डिपॉझिट अन अस्तित्व टिकून राहिल हे बघा; धनंजय मुंडेंनी पडळकरांना सुनावलं

पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही पडळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावरू त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुडे यांनीदेखील त्यांच्यावर हल्लाबोल केला. “सूर्यावर थुंकू नका, डिपॉझिट अन अस्तित्व टिकून राहिल हे बघा,” असं म्हणत धनंजय मुंडेंनी पडळकरांना सुनावलं.

आणखी वाचा- “गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल”, जितेंद्र आव्हाड यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा

“राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार यांच्यावर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहिल, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!,” असं धनजंय मुंडे म्हणाले. त्यांनी ट्विटरवून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

आणखी वाचा- “शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला करोना”, गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

काय म्हणाले होते पडळकर?

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे,” असं पडळकर म्हणाले.

“शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. पण सरकार गेल्यानं त्यांना कारवाई करता आली नाही. मात्र, या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसंच घरांसंबंधी निर्णय़ आहेत. विधान परिषदेचं अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु,” असं त्यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 4:13 pm

Web Title: ncp dhananjay munde criticize bjp gopichand padalkar sharad pawar comment dhangar reservation jud 87
Next Stories
1 औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले 125 नवे करोना पॉझिटिव्ह
2 मीटर रिडींगद्वारे वीजबिल देण्यास सुरूवात; घरगुती वीजग्राहकांना हप्त्याने भरता येणार बिल
3 “तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी”; आशिष शेलारांचा सरकारला टोला
Just Now!
X