News Flash

“नाराजांची संख्या वाढू नये…,” ठाकरे सरकार पाडण्याच्या वक्तव्यांवर खडसेंची प्रतिक्रिया

"आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे मला माहिती"

चंद्रकातं पाटील आणि एकनाथ खडसे

राज्यात एकीकडे करोनाचं संकट असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा नेत्यांकडून वारंवार महाविकास आघाडी सरकार पाडण्याची वक्तव्यं केली जात असून भाकीतंही वर्तवली जात आहे. येत्या काही महिन्यात सरकार पडणार असल्याचे दावे भाजपा नेत्यांकडून केले जात आहेत. दरम्यान भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणाऱ्या एकनाथ खडसे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचं बायप्रॉडक्ट; देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
“महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल,” चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान

“आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. “आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.

फडणवीसांच्या जळगावमधील घरी भेट देण्यावरही भाष्य
देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी दिली आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होऊ लागलं होतं. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “मी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे. जेवणही माझ्याकडे करायचे… झोपायचेही. देवेंद्र फडणवीस त्या कालखंडात माझ्या बी-४ बंगल्यावर बऱ्याचदा असायचे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणूनही ते माझ्याकडे जळगाववला मुक्ताईनगरला आले होते. माझ्याकडे सूत गिरणीचं, साखर कारखान्याचं उद्घाटन झालं तेव्हा ते येऊन गेले होते”.

सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचं बायप्रॉडक्ट – देवेंद्र फडणवीस
लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही असं सांगत सरकार पाडण्याच्या प्रश्नावर उत्तर देत आपली बाजू मांडली होती. सरकार पडणं हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळं भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेलं. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही”.

“सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं आमचं बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:21 pm

Web Title: ncp eknath khadse bjp mahavikas aghadi maharashtra government sgy 87
Next Stories
1 फडणवीसांनी जळगावमधील घरी भेट दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 ‘ब्लू टीक’वरून नवाब मलिकांनी मोदी सरकारला लगावला टोला; म्हणाले…
3 नवाब मलिकांनी सांगितलं महाराष्ट्रात करोना आटोक्यात आल्याचं कारण, म्हणाले….
Just Now!
X