02 March 2021

News Flash

राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्या हातावर शिवबंधन

शिवसेनेने राष्ट्रवादीच्या हातकणंगले यातल्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याची चर्चा आहे

राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निवेदिता माने यांनी शिवबंधन हातावर बांधले. याआधी त्यांच्या मुलानेही शिवसेनेत प्रवेश केला. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. निवेदिता माने या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेने सुरुंग लावल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांच्याशी जवळीक साधल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. 28 नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माने कुटुंबाची नाळ ही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली होती. पण हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वाभिमानीला म्हणजेच राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्यानं माने कुटुंब नाराज होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, रुकडी, इचलकरंजी भागात माने कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांनी यापूर्वी दोनदा हातकणंगले मतदारसंघात खासदारपद भूषवलं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 4:18 pm

Web Title: ncp ex mp nivedita mane joins shivsena
Next Stories
1 दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला मिळणार ८७ लाख रुपये नुकसान भरपाई
2 गोडवा कमीच! दुष्काळामुळे राज्यात साखरेच्या उत्पादनात होणार घट: मुख्यमंत्री
3 हवामान बदललं, दोन दिवसात पावसाची शक्यता
Just Now!
X