News Flash

“कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री”; अनिल देशमुख यांचं सूचक विधान

"महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही"

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता यामध्ये मोठी कलाटणी मिळाली आहे. संबंधित महिलेविरोधात अनेकांनी ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. यानंतर महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री असं म्हणत सूचक विधान केलं आहे.

अनिल देशमुख यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पीडित महिला आपला जबाब नोंदवला जात नसल्याची तक्रार करत असून एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्यासंबंधी अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”.

‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

मुंडेंवरील आरोपांना नवी कलाटणी
मुंडे यांच्यावर आरोपाला नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 1:02 pm

Web Title: ncp home minister anil deshmukh on dhananjay munde sgy 87
Next Stories
1 ठाकरे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही- संजय राऊत
2 “इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत”
3 “मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”
Just Now!
X