News Flash

मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

"मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे..."

प्रतिकात्मक छायाचित्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थिल्लरपणा करु नये असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकू नका असं म्हटलं आहे यावर आपलं काय म्हणणं आहे असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंकडे चांगली संधी आहे,” फडणवीसांनी करुन दिली ‘त्या’ मागणीची आठवण

जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला. असे शब्द वापरणे चुकीचं आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती; रोहित पवारांनी मोदी सरकारला मदतीवरून सुनावलं

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये. पंतप्रधान मोदी देशावर संकट आलं तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतःची तुलना करु नका. आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करतं ते महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा करावी. केंद्र सरकार मदत करेल. मात्र राज्य संकटात असताना आणि संकटं जाणून घेत असताना अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 2:06 pm

Web Title: ncp jayant patil on bjp devendra fadanvis maharashtra government sgy 87
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसारखा दौरा करु नये”
2 ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट
3 “नाथाभाऊ कुठे जाणार…,” खडसेंच्या नाराजीवर चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया
Just Now!
X