25 January 2021

News Flash

धनंजय मुंडे आणि नवाब मलिकांचा राजीनामा? राष्ट्रवादीने केलं स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन मोठे धक्के बसले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या दोन मोठे धक्के बसले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात झालेली अटक यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या विरोधक निशाणा साधत आहेत. दोन्ही मंत्र्यांचे राजीनामा घेतले जावेत अशी मागणी वारंवार केली जात आहे. दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा नक्की घेतला जाईल. आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करु. तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेऊ,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचे राजीनामे घेतले जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राजीनामा कोणीतरी आरोप केला म्हणून देणं ही बाब होणार नाही. पण या बाबतीत आम्ही पक्ष स्तरावर योग्य ती चर्चा करणार आहोत. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, त्यांचा काही दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित यंत्रणा जिथे त्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्या यंत्रणा भूमिका घेतील, त्यानंतर आम्ही विचार करु”.

“पोलिसांनी तात्काळ…,” धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

“नवाब मलिक यांच्याबाबतीत बोलायचं गेल्यास त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी सोडलं मौन; म्हणाले…

दरम्यान जयंत पाटील यांना यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” सांगत जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 2:00 pm

Web Title: ncp jayant patil over resignation of dhananjay munde and nawab malik sgy 87
Next Stories
1 पंकजा मुंडेंचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश? जयंत पाटलांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
2 जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले
Just Now!
X