News Flash

Video: जेएनपीटीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचा आयएएस अधिकाऱ्याला शिवीगाळ

संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद

राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांची सनदी अधिकाऱ्याला शिवीगाळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सनदी अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. रायगडच्या उरण येथील जेएनपीटीच्या प्रशासकीय विभागात घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील सनदी अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील एका सनदी अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी जेएनपीटीच्या प्रशासकीय विभागात गेले होते. यावेळी काही स्थानिक प्रश्नांवर पाटील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. या चर्चेवेळी पाटील यांचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्यांनी सनदी अधिकाऱ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला शिवीगाळदेखील केली.

या प्रकरणी प्रशांत पाटील यांच्याविरोधात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याआधी गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी उप जिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांच्यावर हल्ला केला होता. सुरेश लाड हे कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 3:17 pm

Web Title: ncp leader abuses misbehaves with ias officer in raigad
Next Stories
1 सांगली पोलीस मुख्यालय परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी
2 सर्वोच्च न्यायालयाने कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची ‘ती’ याचिका फेटाळली
3 BLOG | अहो कारभारी.. हे वागणं बरं नव्हं..
Just Now!
X