वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसेल तर अिहसात्मक मार्गाने सनदशीर आंदोलने केली जातात. या वेळी कायदा व सुरक्षा राहावी म्हणून पोलीस बंदोबस्त पुरवत असतात. मात्र रायगड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजा केणी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण याला अपवाद ठरते आहे. उपोषणाच्या ठिकाणी चक्क बाऊन्सर्स अर्थात खासगी अंगरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई करावी आणि आंबानदी सक्शन पंप मुक्त व्हावी या मागणीसाठी राजा केणी सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाच्या ठिकाणी स्वसंरक्षणासाठी त्यांनी चक्क पाच बाउन्सर तनात केले आहेत. त्यामुळे बाउन्सर्सच्या सुरक्षा कवचात करण्यात आलेले रायगड जिल्ह्य़ातील हे पहिलेच आमरण उपोषण आंदोलन ठरले आहे. अंबा नदी आणि धरमतर खाडीत सध्या बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे बांधबंदिस्तीला धोका निर्माण झाला आहे. बांध फुटल्यास नदीचे पाणी देहेन, मेढेखार, काचळी, पिटकिरी, वाघवीरा या गावांतील लोकवस्तींमध्ये घुसेल. तसेच कुसुंबळे व कुर्डूस परिसरातील ८५० एकर जमीन नापीक होण्याची भीती आहे. याचा विचार करून हे रेती उत्खनन ताबडतोब थांबविण्यात यावे अशी मागणी राजा केणी यांनी केली आहे. अनधिकृतपणे सुरू असलेले रेती उत्खनन ताबडतोब थांबविण्यात यावे. अनधिकृत रेती उत्खननास अभय देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. ज्या सक्शन पंपमालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची नावे जाहीर करून त्यांची यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी. खाऱ्या पाण्यापासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी. रेती माफियांवर गुन्हे नोंदवावेत, अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

केणी हे सनदशीर मार्गाने आमरण उपोषणाला बसले आहेत. असे आमरण उपोषण हे अिहसेच्या मार्गाने केले जाणारे आंदोलन आहे. असे असताना या आंदोलनाच्या ठिकाणी तनात करण्यात आलेले खासगी सुरक्षारक्षक चच्रेचा विषय बनला आहे. बाउन्सर्सच्या सुरक्षा कवचात करण्यात आलेले रायगड जिल्ह्य़ातील हे पहिलेच उपोषण आंदोलन ठरले आहे.