शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर बोचरी टीका केली असतानाच आता अजित पवारांनीही यावर प्रत्युत्तर दिले. मी गांडूळ म्हटल्याने शिवसेनेची मळमळ बाहेर पडली. आता गांडूळ कोण हे जनताच ठरवेल, असे सांगत पवारांनी सेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

गुरुवारी शिवसेनेच्या अग्रलेखातून अजित पवारांवर विखारी टीका करण्यात आली होती. शिवसेनेला गांडुळाची उपमा देणारे अजित पवार हे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहे. त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या जाणाऱ्यांवर त्याच तोंडाने थुंकून ते घाण करत असतात. शरद पवारांनी कमावलेलं अजित पवारांनी अल्पावधीतच गमावलं. अजित पवार दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहेत काय, असे शिवसेनेने म्हटले होते.

शिवसेनेच्या या टीकेवर अजित पवारांनी सांगलीत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना गेल्या १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर होती. त्यामुळे आता त्यांना सत्ता हवी आहे. शिवसेनेचे १२ मंत्री आहेत. हे नेतेमंडळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत नाही. मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की गप्प बसतात आणि तिथून बाहेर पडल्यावर सरकारवर टीका केली जाते. ही दुटप्पी भूमिका असल्यानेच मी शिवसेनेचा उल्लेख गांडूळ असा केला, असे त्यांनी सांगितले. गांडूळ म्हटल्यानेच शिवसेनेची मळमळ बाहेर आली. पण आता गांडूळ कोण हे जनताच ठरवेल, असे त्यांनी सांगितले. शिवसेना म्हणजे ढेपेला लागलेला मुंगळा असल्याची टीका त्यांनी केली.

वाद कशावरुन सुरु झाला?
कोल्हापूरमधील सभेत अजित पवारांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. भाजपसोबत सत्तेत बसायचं, कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा. शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे. त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही, असे अजित पवारांनी म्हटले होते. या टीकेवर शिवसेनेने गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उत्तर दिले होते. निवडणु