News Flash

फक्त विजयच…अशी आहे अजित पवारांची राजकीय कारकीर्द

अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी तडकाफडकी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

संग्रहित

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी तडकाफडकी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत.

अजित पवार यांची कारकीर्द

– २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे अजित पवारांचा जन्म झाला.

– पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचे मूळगाव आहे.

– देवळालीमध्येच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

– अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्यावर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.

– पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.

– १९९१ साली सर्व प्रथम अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिम्हा राव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.

– त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून गेले.

– १९९५ साली युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.

– विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याता अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
– २००४ साली आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते त्यांच्याकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 6:54 pm

Web Title: ncp leader ajit pawar political career dmp 82
Next Stories
1 अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
2 नागपूर : पोलिसावर हल्ला करणारे तिघे जेरबंद
3 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यू
Just Now!
X