News Flash

चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी; अजित पवारांचा टोला

ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी....

राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल एका मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनाश काले, विपरीत बुद्धी म्हणावं लागेल, अशा शब्दात निशाणा साधला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी, ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात 60 वर्ष काम केले आहे. महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे. ते सर्वांनी पाहिले आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याला पवार साहेबाबद्दलचे विधान शोभत नाही. ऐकेकाळी साहेबांबद्दल काय विधान केले आहे. हे सर्वांना आठवत असेल, त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

करोनावर म्हणाले….
करोना आजाराचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून पूर्वीसारखी परिस्थिती होण्याच्या दृष्टीने सरकार काम करीत आहे. मात्र त्याच दरम्यान दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. आपल्या पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मेळाव्यात करताच सभागृहात एकच हशा पिकला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 5:02 pm

Web Title: ncp leader ajit pawar slam bjp state chief chandrakant patil svk 88 dmp 82
Next Stories
1 आता फक्त ३९ दिवसच राहिलेत; काँग्रेस नेत्याचा भाजपाला चिमटा
2 पुण्यातील गर्दीत करोना चेंगरून मेला की काय असं मला वाटलं – अजित पवार
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार? जनतेशी साधणार संवाद
Just Now!
X