News Flash

बारामतीत या, तुम्हाला दाखवतोच! अजित पवारांचा महाजनांना इशारा

बारामती काय आहे ते ठाऊक आहे का? निघाले बारामती जिंकायला असे म्हणत अजित पवार यांनी महाजन यांना टोला लगावला

पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांच्या बारामतीतही विजय मिळवून दाखवेन असे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बारामती काय आहे ते ठाऊक आहे का? बारामतीत या दाखवतोच असा इशाराच अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेदरम्यान पारोळा याठिकाणी झालेल्या सभेत अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना उत्तर दिले आहे. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर कायमच प्रेम केलं आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देतात. बारामती काय आहे ते माहित नाही आणि चालले बारामती जिंकायला. महाजन सांगतात बारामती जिंकून दाखवेन, ते एवढं सोपं आहे का? तरीही तुमची इच्छा असेल तर बारामतीत जरुर या! असे खुले आव्हानच अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिले.

याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. एकनाथ खडसेंवरही त्यांनी टीका केली. ‘खडसे यांच्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याने त्यांना बाहेर रहावे लागत आहे, ते दोषी असल्यास एक तर त्यांना शिक्षा द्या किंवा दोषी नसतील तर सोडून द्या. मुख्यमंत्री फडणवीस हे खडसे यांच्यावर प्रेम करीत नाही हेच खरे आहे. हे सगळे होत असताना आम्ही जेव्हा सत्तेत असताना स्वाभिमान दाखवणारे खडसे गप्प का?, कोणाला घाबरत आहे हा आम्हाला ही प्रश्न पडला आहे’, असं जयंत पाटील म्हणाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 8:10 pm

Web Title: ncp leader ajit pawars open challenge to minister girish mahajan
Next Stories
1 युती झाली नाही तर रावसाहेब दानवेंचा पराभव निश्चित-संजय काकडे
2 Video: फुगेवाडीत व्हॉल्व नादुरुस्त, हजारो लिटर पाणी वाया
3 मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद
Just Now!
X