राज्यावर पुन्हा एकदा करोना संकट आलं असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील आठ दिवस परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला करोनाची लागण झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राजेश टोपे आणि एकनाथ खडसे यांनाही करोनाची लागण झाली आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारोंची गर्दी; शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी

छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी”.

विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. शरद पवार आणि भुजबळ एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने आता शरद पवारांचीदेखील करोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार रद्द

नेत्यांना करोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून नेत्यांचे जनता दरबार रद्द करण्यात आले आहेत. नुकतंच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आयोजित केलेला जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.