पुणे आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसले आहेत. त्यांना जनतेबद्दल कळवळाच नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील नागरिकांना मतद करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना निवडणुकांची काळजी आहे, म्हणूनच ते अशा बिकट प्रसंगीही जनतेला मतद करण्याऐवजी निवडणुकीच्या कामाऐवजी दिल्लीला जाऊन बसले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर परिस्थितीतही मुख्य़मंत्र्यांनी तेच केलं होतं. त्यांना जनतेचा कळवळा नाही, असं ट्विट करून धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रशासनाने पुण्यात अधिक लक्ष द्यावे तसेच नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने पुण्यात थैमान घातलं आहे. पुण्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.