News Flash

सत्ताधाऱ्यांना सरकार चालवायची अक्कल नाही – धनंजय मुंडे

अरे सभास्थानी फटाके कशाला वाजवता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक नेता एक तोफ आहे त्यामुळे सभेच्या ठिकाणी असे छोटे मोठे फटके वाजवून वेळ घालवू नका.

अरे सभास्थानी फटाके कशाला वाजवता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक नेता एक तोफ आहे त्यामुळे सभेच्या ठिकाणी असे छोटे मोठे फटके वाजवून वेळ घालवू नका असे वक्तव्य करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पारनेर येथील सभेत तुफान प्रतिसाद मिळवला.
परिवर्तन यात्रे दरम्यान आज पारनेर येथील शिवसेनेचे नेते निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला त्यावेळी मुंडे बोलत होते.

यावेळी बोलताना मुंडे यांनी राज्यातील इतर घडामोडींनाही हात घातला. कांद्याला पाच रुपये अनुदान पाहिजे होते सरकारने दिले फक्त २ रुपये ते ही ऑक्टोबरपर्यंत. या सत्ताधाऱ्यांना सरकार चालवायची अक्कल नाही अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले तर पारनेरचा पाण्याचा प्रश्न पहिला सोडवला जाईल असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

आमदार विजय औटी यांचे नाव न घेता इशारा
इथले आमदार फार दहशत पसरवतात मी आमदाराला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसला दहशत दाखवू नका. तुमचे फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत हे लक्षात ठेवा अशा शब्दात कार्यकर्त्यांना बळ दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 9:37 pm

Web Title: ncp leader dhananjay munde slam bjp
Next Stories
1 तावरजखेड्यात महिनाभरात तीन शेतकरी आत्महत्या, अस्थिकलश देवून करणार प्रशासनाचा निषेध
2 ५ महिन्यांच्या बाळाची लाळ थांबवण्यासाठी फिरवलेला जिवंत मासा अडकला अन्ननलिकेत
3 काँग्रेसने जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर लढू- प्रकाश आंबेडकर
Just Now!
X