News Flash

एकनाथ खडसे पुन्हा करोना पॉझिटिव्ह?

ईडी कार्यालयात जाण्याऐवजी एकनाथ खडसे १४ दिवस विश्रांती घेणार

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी केलेलं ट्विट. एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.  तसंच आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण करोनाची चाचणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ईडी कार्यालयात जाण्याऐवजी १४ दिवस विश्रांती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

हे ही वाचा – एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ची नोटीस 

या आधी नोव्हेंबर महिन्यातही एकनाथ खडसेंना करोनाची बाधा झाली होती. त्यांना उपचारांसाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांनी ट्विट करुन करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असंही आवाहन केलं होतं. आज एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात आलेल्या नोटीशीमुळे जाणार होते. मात्र ते रद्द करत त्यांनी १४ दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्यामुळे घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या करोना चाचणीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.

तीन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर आपण ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील भोसरी या ठिकाणी असलेल्या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना नोटीस बजावली. त्यानंतर आपण ३० डिसेंबरला मुंबईतल्या ईडी कार्यालयात हजर राहणाऱ असल्याचं त्यांनी सांगितलंही होतं. मात्र आज त्यांना थंडी, ताप, सर्दी आणि थोडा खोकला येऊ लागला. ही करोनाची लक्षणं असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र त्यांना १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आपण ईडी कार्यालयात १४ दिवसांनी हजर राहू असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 2:36 pm

Web Title: ncp leader eknath khadse corona positive again scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘थर्टीफर्स्ट’चं प्लॅनिंग करताय? आधी गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचना वाचाच
2 एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…- राम कदम
3 ‘सीबीआय’ला रोखलं म्हणून आता ‘ईडी’चा वापर- गृहमंत्री अनिल देशमुख
Just Now!
X