News Flash

… तर नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या : हुसैन दलवाई

सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी केलं आहे. “त्यांना भारतरत्न देण्यास केवळ आम्हालाच नाही तर अनेकांना अडचण आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येत त्यांचा हात होता, हे पटेलांनीच लिहून ठेवलं आहे. त्यांना जर तुम्ही म्हणत असाल तर या देशाच्या भवितव्य काय असेल हेदेखील लक्षात येत,” असं ते म्हणाले.

“जर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणार असाल तर नथुराम गोडसेलाही भारतरत्न देण्यात यावा,” असा उपरोधिक टोला दलवाई यांनी लगावला. “अशा प्रकारचा कोणताही आग्रह येणाऱ्या सरकारनं करू नये. जे मुद्दे अडचणीचे आहेत ते टाळून येणारं सरकार हे पाच वर्ष चाललं पाहिजे. सावरकरांची हिंदुत्वाची जी संकल्पना ती धोकादायक आहे. हिंदूंना त्यांचे हक्क मिळालेच आहे. या ठिकाणी ८०-८५ टक्के हिंदू आहेत. तर त्यात घाबरण्याचं काय कारण आहे? कोणीही सार्वजनिक जीवनात धर्माची भूमिका आणू नये. मुस्लिमांनीही ती आणू नये अशी माझी भूमिका आहे. काही प्रश्न धर्माच्या पलिकडे जाऊन सोडवणं आवश्यक आहे. याबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे,” असंही ते म्हणाले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत वक्तव्य केलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचा खुलासा केंद्र सरकारनं केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील सूचक वक्तव्य केले. केंद्राकडे अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून भारतरत्न देण्यासंदर्भातील शिफारशी केल्या जातात. मात्र भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता असते असं नाही. शिफारस केली नसतानाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. भारतरत्न देण्यासंदर्भातील निर्णय योग्य वेळी घेतला जातो. असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:57 pm

Web Title: ncp leader hussain dalwai on bharatratna to swatantryaveer sawarkar government jud 87
Next Stories
1 पवार-मोदींमध्ये ४५ मिनिटांची भेट, नेमकी काय झाली चर्चा ?
2 खळबळजनक विधान : … तर मुस्लिमांवर होतील हल्ले : हुसैन दलवाई
3 शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात – शरद पवार
Just Now!
X