सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका तथा माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर “अप्पा मला बळ द्या” असं म्हणत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे म्हणत एक संग्रहित व्हिडीओ शेअर करून एक भावनिक पोस्ट केली आहे. सत्तेत आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर, कष्टकरी, वंचित उपेक्षित, दीन – दुबळ्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी या सरकारमध्ये मिळाली असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गोरगरीब – कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्याला काम करायचे असून, या वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या; अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे घातली आहे.
अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात…
तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित-उपेक्षित, दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचा विकास साधण्यासाठी मला बळ द्या!
विनम्र अभिवादन pic.twitter.com/owQxBvlWrZ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 3, 2020
येणाऱ्या काळात गोरगरीब – कष्टकरी, वंचित – उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले तर तीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली असेल. तसेच आपल्या गुरूला अर्पण केलेली गुरुदक्षिणा असेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 5:43 pm