महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले. वेल डन महाराष्ट्र! असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केलं आहे. सोमवारी राज्यातील ५ हजार ०७१ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. राज्यात दुसऱ्यांदा एवढ्या विक्रमी संख्येनं लोकांना घरी सोडण्यात आलं. यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात करोनानं थैमान घातलं असताना सोमवारी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात एकाच दिवशी ५ हजार ७१ कोरोना रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देणअयात आली.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे समाधान व्यक्त करत याचं श्रेय राज्यातील जनतेला तसेच अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाला असल्याचं म्हटलं आहे.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
What Raj Thackeray Said About Sanjay Raut?
राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..”
What Rohit Pawar Said About Sunil Tatkare?
रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका, “दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून भाजपात..”
Sanjay Nirupam
“संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली, आता…”, काँग्रेसमधील नेत्याचं मोठं विधान

“आज एकाच दिवशी ५०७१ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यापैकी ४२४२ रुग्ण मुंबई शहर व उपनगरातील आहेत. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हे फक्त आणि फक्त राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झालं आहे,” असं पाटील म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “राज्याने दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. करोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे,” असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.