News Flash

राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार – जयंत पाटील

'त्या' प्रश्नावर दिलं उत्तर....

“दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे, जे बोलत आहेत, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतं. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्रस्त करुन सोडणं हा प्रयत्न काही जण करतायत. हे देशातल्या जनतेला कळलं आहे” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील म्हणाले.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

वर्षभरापासून सरकार पाडण्यासाठी ईडी आणि वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी “राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार. ते खरं आहे” असे उत्तर दिले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 5:20 pm

Web Title: ncp leader minister jayant patil slam bjp over ed notice to sanjay raut wife svk 88 dmp 82
Next Stories
1 “संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा”
2 एक एकराच्या जागेत १३० टन ऊस, सांगलीचा शेतकरी कमावतोय लाखांमध्ये
3 बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं-संजय राऊत
Just Now!
X