28 February 2021

News Flash

महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी फिरायलाही हवं : शरद पवार

अजित पवारांची अधिक गरज मंत्रालयात, शरद पवारांचं मत

संग्रहित फोटो (PTI)

“महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. तसंच राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केलं. काही दिवसांपूर्वी सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडीचं स्टेअरिंग आपल्याकडे असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील वातावरणं तापल्याचं पाहायला मिळत आहे. सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

“महाविकास आघाडीचा रिमोट माझ्या हाती नाही. सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे जावं यावर सर्वांचं एकमत झालं,” अशी माहितीही पवार यांनी बोलाताना दिली.

“धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतच आहे. तसंच निर्णय घेताना ते सर्व सहकाऱ्यांनाही विश्वासात घेतात. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काही वाद नाही. परंतु त्यांनी थोडं फिरायलाही हवं,” असं पवार म्हणाले. काही दिवसांपासून मुख्यमंत्री हे केवळ मातोश्रीवर बसूनच काम करत आहेत. तसंच राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीवरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती.

आणखी वाचा- …तर आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

नवा पर्याय नाही, सरकार चालणार

सध्या कोणताही नवा पर्याय नसल्यामुळे महाविकास आघाडीचं हे सरकार पाच वर्षे चाचेल. देवेंद्र फडणवीस हे आता कमालीचेच अस्वस्थ झाले असून त्यांना सरकार पाडण्याची घाई झाली आहे. परंतु सद्यस्थितीत निवडणूक कोणालाही नको असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजित पवारांची गरज मंत्रालयात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख यांना बाहेर फिल्डवर काम करण्याची गरज असल्याचंही शरद पवार म्हणाले.

आणखी वाचा- “कुर्बानीनं करोना जाणार म्हणजे…”; शरद पवारांना प्रविण दरेकरांचा टोला

भूमिपूजनाला जाणार नाही

सध्या देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 3:47 pm

Web Title: ncp leader mp sharad pawar spacial interview spoke about cm uddhav thackeray ajit pawar ram mandir coronavirus jud 87
Next Stories
1 मुंबई, ठाण्यासह कोकणात पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
2 राज्यात २४ तासांत १३८ पोलीस करोना पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
3 …तर आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील
Just Now!
X