09 March 2021

News Flash

महाभरतीमध्ये भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या मार्गावर; प्रवक्त्यांनी दिली माहिती

पुन्हा एकदा नेत्यांचं पक्षांतर होण्याची शक्यता

“राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल,” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
“राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून, ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छुक आहेत,” असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मौन सोडलं असून या बातमीचं खंडण केलं आहे. उलट भाजपात गेलेले नेते राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

कुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है,
उलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी ।@PTI_News @ani_digital

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020

राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते भाजपात नाराज असल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 10:51 am

Web Title: ncp leader nawab malik bjp mahavikas aghadi 12 mla nck 90
टॅग : Ncp
Next Stories
1 मुंबईत आता आवाजावरून होणार कोविड टेस्ट; करोनाला रोखण्यासाठी BMCचं महत्त्वाचं पाऊल
2 विशेष : दुर्मिळ होत चाललेली गोष्ट! कधीही पक्षांतर न करता ते अकरा वेळा आमदार झाले
3 ७० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य
Just Now!
X