22 April 2019

News Flash

बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण ? मोदी, शाह की फडणवीस – नवाब मलिक

तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल असे अमित शाह म्हणाले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे बोलताना त्यांनी तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल असे म्हणाले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उपरोधिक टीका केली आहे.

अमित शाह म्हणाले महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू आणि ४५वी जागा #बारामती असेल. ४८ पैकी ४५ बोलले हे बरं, नाहीतर ५० सांगायलाही कमी केलं नसतं. आता बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण? मोदी, शाह की देवेंद्र? जाहीर करा! असे म्हटले आहे.

देशभरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी केली जात आहे. हे कसले गठबंधन ? हे तर सगळे राज्यातले नेते आहेत. जर महाराष्ट्रात ममतांची सभा कोल्हापूरला लावली. अखिलेशला धुळयाला बोलावले तर कोणी ऐकायला जाणार आहे का? अशा शब्दात अमित शाह यांनी महाआघाडीमधील नेत्यांवर सडकून टीका केली.

ज्या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करीत आहेत. ते या राज्यातील असून त्यांचे १५ वर्ष सरकार महाराष्ट्रात होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पण आमच्या सरकारने पारदर्शक कारभार करीत भ्रष्ट्राचार नष्ट केल्याचे सांगत शरद पवार यांच्यावर अमित शाह यांनी टीका केली.

First Published on February 9, 2019 4:26 pm

Web Title: ncp leader nawab malik slams amit shah