News Flash

मंदिर आणि धार्मिक स्थळं सुरू करायला हवी, कारण…; रोहित पवारांनी मांडली भूमिका

करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा घेण्यात आला आहे निर्णय

रोहित पवार, आमदार (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात पवार कुटुंबीयांची अधिक चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार हे अपरिपक्व असल्याचं म्हटलं होतं. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत आपण पाठपुरावा करू असं आश्वासन रोहित पवार यांनी दिलं आहे.

“मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या व्यवसायिकांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. तसंच लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. याबाबत मी नक्कीच पाठपुरावा करेन,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहे. परंतु आता रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर सरकारमधील नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 8:33 pm

Web Title: ncp leader rohit pawar comment on religious places should be open ajit pawar sharad pawar cm uddhav thackeray jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालघर : बोईसर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करोना संसर्गाची शक्यता
2 माजी खासदार निलेश राणेंना करोनाची लागण
3 सुशांतसिंह प्रकरणी बिहार-महाराष्ट्र पोलीस चर्चेचा विषय; सचिन सावंतांचे भाजपा नेत्यांना चिमटे
Just Now!
X