26 February 2021

News Flash

“फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्रानं पाहिली”

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला प्रत्युत्तर

संग्रहित छायाचित्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर भाजपानं महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी भाजपाकडून करण्यात आली. भाजपाकडून होणाऱ्या टीकेवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्याचबरोबर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. भाजपाकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- सुशांत प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत, नितेश राणेंचा गंभीर आरोप

“महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांना मी आठवण करून देते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये !,” अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

आणखी वाचा- …तर हे डीजीपी नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील; जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपाचे नेते किरीट सौमेय्या यांनी राज्य सरकारवर टीका करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचबरोबर भाजपाच्या इतर नेत्यांनीही राज्य सरकार निशाणा साधला होता. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला चाकणकर यांनी उत्तर दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 11:23 am

Web Title: ncp leader rupali chakanakar criticised bjp leaders of maharashtra bmh 90
Next Stories
1 आत्महत्याग्रस्त उस्मानाबादला मिळणार दरवर्षी हजार कोटींचा लाभ
2 पेन्शन हा मूलभूत अधिकार; कायदेशीर परवानगीशिवाय कपात करता येणार नाही : उच्च न्यायालय
3 …तर हे डीजीपी नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील; जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा
Just Now!
X