निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे या घरातून-त्या-घरात उड्या मारणे सुरू झाले आहे. नुकतेच शिवसेनेचे शिर्डीतील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा मार्ग अवलंबला तर, आता राष्ट्रवादीचे सांगली जिल्ह्यातील आमदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आमदार संजयकाका पाटील यांनी आज(मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा थेट विधानपरिषदेत केली. संजय पाटील यांच्यासोबत आणखी तीन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे परंतु, अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.