News Flash

“सांगलीत राष्ट्रवादीचा ‘टप्प्यात कार्यक्रम’ आणि आता जळगावात सेनेचा भगवा; भाजपाला ओहोटीचे दिवस”

"सांगलीमध्ये 'टप्प्यात आल्यावर' राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचा कार्यक्रम केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली"

( देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचं संग्रहित छायाचित्र )

सांगलीमध्ये ‘टप्प्यात आल्यावर’ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचा कार्यक्रम केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावल्याने भाजपाला ओहोटी सुरू झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

“सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा ‘टप्प्यात कार्यक्रम’ करत राष्ट्रवादीचा महापौर केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे. जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला असून भाजपाचा उधळलेला वारु आता ओहोटीच्या रुपात दिसू लागला असल्याचे यावरून स्पष्ट होते आहे”, असे महेश तपासे म्हणाले.

दरम्यान, भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली असून महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे. २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या भाजपाने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवलं आहे. जयश्री महाजन यांनी प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपलं नाव निश्‍चित केलं. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. भाजपाचे २७ नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 2:33 pm

Web Title: ncp mahesh tapase says decline of bjp starts after shivsena wins jalgaon municipal corporation election sas 89
टॅग : Bjp,Ncp
Next Stories
1 जळगावात भाजपाने सत्ता गमावली; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा
2 “मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंचीही हत्या होऊ शकते”
3 क्षिती जोग साकारणार नवी भूमिका; ‘झिम्मा’च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश
Just Now!
X