News Flash

रोहित पवार म्हणतात, ‘या’ व्यक्तीसोबत लाँग ड्राइव्हला जायला आवडेल

फावल्या वेळेत करतात 'हे' काम

रोहित पवार. (संग्रहित छायाचित्र)

उत्तम संघटन, वक्तृत्व आणि माणुसकी या गुणांमुळे राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री शरद पवार यांचे नातू रोहित पवार लोकप्रिय आहेत. राजकीय कामगिरीसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना, लाँग ड्राइव्हला कोणासोबत जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता.

‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर दिलं, “मला गाड्यांची विशेष आवड आहे. भावंडांसोबत, ठराविक मित्रांसोबत मी फिरायला जातो. पण लाँग ड्राइव्हसाठी मला पत्नी कुंतीसोबत जायला आवडतं. गाडीमध्ये मागे मुलं बसतात आणि थोड्या वेळानंतर त्यांच्यात भांडणं होतात की पुढे कोण बसणार आणि त्यात डेस्टिनेशन कधी येतं हेच कळत नाही. लाँग ड्राइव्हला जायची आवड असली तरी व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळत नाही.”

फावल्या वेळेत फेसबुक, ट्विटर किंवा सोशल मीडिया पाहण्यापेक्षा कुटुंबीयांसोबत वेळ घालवणं आवडतं, असंदेखील ते म्हणाले. “मला मुलांसोबत कार्टून बघायला आवडतं. कारण यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो आणि माझ्याही लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर येतात,” असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 11:19 am

Web Title: ncp mla rohit pawar wants to go on long drive with this person ssv 92
Next Stories
1 विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही; राज्यमंत्री तनपुरे यांची माहिती
2 पंतप्रधानांनी एवढं सांगितलं तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल; संजय राऊत यांचा सल्ला
3 कृषीपंपांची वीज थकबाकी चारपट
Just Now!
X